पेठ तालुक्यात बोगस डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 1, 2015 00:14 IST2015-08-01T00:11:47+5:302015-08-01T00:14:30+5:30
अतिदुर्गम अंबास गावात सुरू होता बेकायदेशीर व्यवसाय

पेठ तालुक्यात बोगस डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल
पेठ : महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या अंबासगावी चार वर्षांपासून कोणतीही वैद्यकीय
पदवी नसताना बेकायदेशीर डॉक्टरी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टराचा भांडाफोड झाला असून,
संशयिताची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे़
अंबासनजीक असलेल्या खिर्डी भाटी या गावी सध्या राहणाऱ्या पवित्र शांताराम सरकार (रा़ टिटोलिया पश्चिम बंगाल) हा परिसरात बोगस वैद्यकीय व्यवसाय करत होता. दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय अधिकारी डॉ़ निशांत पाडवी हे अंबास येथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी पथकाबरोबर गेले असता गावात एका महिलेला सलाईन लावलेली आढळून आली़
चौकशी केली असता, पवित्र सरकार नावाचे डॉक्टर असल्याचे सांगण्यात आले़ डॉ.पाडवी यांनी कागदपत्रांची मागणी केली असता संबंधिताकडे कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आल्याने वैद्यकीय अधिकरी डॉ़ पाडवी यांनी पेठ पोलिसांत फिर्याद दिली़
पोलीस निरीक्षक व्ही़ डी़ ससे यांनी तत्काळ कार्यवाही करत संशयितास अटक करून न्यायालयासमोर उभे केले
असता, त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली़ आहे.
(वार्ताहर)