अस्ताणेत दंगलीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:14 IST2021-05-22T04:14:35+5:302021-05-22T04:14:35+5:30

मालेगाव : तालुक्यातील अस्ताणे येथे जमाव जमवून कृषी विभागातील सेवानिवृत्त पर्यवेक्षकाला शिवीगाळ व दमदाटी करत जीवे ...

Filed a case of rioting in Astana | अस्ताणेत दंगलीचा गुन्हा दाखल

अस्ताणेत दंगलीचा गुन्हा दाखल

मालेगाव : तालुक्यातील अस्ताणे येथे जमाव जमवून कृषी विभागातील सेवानिवृत्त पर्यवेक्षकाला शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात चंद्रशेखर चिंतामण पगार, शरद निंबा पगार, किरण गुलाब पगार, दिग्विजय चंद्रशेखर पगार, कीर्तीघोष चंद्रशेखर पगार, लक्ष्मीकांत चंद्रशेखर पगार (सर्व रा. अस्ताणे) यांच्याविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक साहेबराव दामू वाघ (रा. गोळीबार मैदान, ओंकार कॉलनी, कॅम्प) यांनी तालुका पोलिसात याविषयीची फिर्याद दिली आहे. अस्ताणे येथे फिर्यादीच्या शेतात ही घटना घडली. आरोपींनी बेकायदा जमाव जमवून फिर्यादीच्या शेतात अतिक्रमण करून मुरूम व दगड टाकत शेतातील झाडांचे नुकसान केले. यावेळी फिर्यादी हे समजावण्यास गेले असता, शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास जमादार राजपूत करत आहेत.

Web Title: Filed a case of rioting in Astana