विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:34+5:302021-07-19T04:11:34+5:30
कापसे यांनी तक्रारीत म्हटले आहे, मुलीचा विवाह झाल्यानंतर एक वर्षानंतर ‘तुझ्या वडिलांनी आम्हाला हुंडा दिला नाही. त्यांच्याकडून पैसे घेऊन ...

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल
कापसे यांनी तक्रारीत म्हटले आहे, मुलीचा विवाह झाल्यानंतर एक वर्षानंतर ‘तुझ्या वडिलांनी आम्हाला हुंडा दिला नाही. त्यांच्याकडून पैसे घेऊन ये’ असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असे. हा त्रास जवळपास १२ वर्षे सुरू होता. शेवटी या छळाला कंटाळून दि. १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपूर्वी तिने घराजवळील सार्वजनिक विहिरीत आपली जीवनयात्रा संपवली. यासंदर्भात संशयित आरोपी पती शरद दत्तू पवार (३३), सासरा दत्तू पवार (६५) व सासू मीराबाई पवार (६०) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक राणी डफळ, महिला पोलीस नाईक ज्योती राऊत करत आहेत.