मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 22, 2017 00:32 IST2017-04-22T00:32:35+5:302017-04-22T00:32:44+5:30
वणी : शेतजमिनीतील सामाईक विहिरीच्या पाणी वापराच्या वादातुन कुरापत काढुन गंभीर स्वरूपाची मारहाण करणाऱ्या ४ संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
वणी : शेतजमिनीतील सामाईक विहिरीच्या पाणी वापराच्या वादातुन कुरापत काढुन गंभीर स्वरूपाची मारहाण करणाऱ्या ४ संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यातील कृष्णगाव शिवारात बाळासाहेब वडजे यांची शेतजमिन असुन यांचेजमिनीलगत संजय वडजे यांची शेतजमिन आहे या दोन्ही कुटुंबियांमधे पाणी वापराबाबत वाद झाला. त्यात दिपक संजय वडजे विशाल संजय वडजे प्रदिप संजय वडजे संजय दिनकर वडजे यांनी बाळासाहेब वडजे व कुटुबियांना मारहाण शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्र ार संदीप बाळासाहेब वडजे यांनी दिल्याने चौघा संशियतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)