अघोरी साधू दाखल

By Admin | Updated: August 7, 2015 23:50 IST2015-08-07T23:49:10+5:302015-08-07T23:50:32+5:30

अघोरी साधू दाखल

File a complaint | अघोरी साधू दाखल

अघोरी साधू दाखल

.नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममध्ये देशभरात अनेक संप्रदायाचे साधू-महंत आलेले दिसतात. त्यापैकी काळे कपडे घातलेले अघोरी विद्यावाले शैव संप्रदायाच्या साधूंबद्दल अनेकांना उत्सुकता वाटते. त्यांच्या भयानक वेशभूषेमुळे सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण होते. पंचवटी स्मशानभूमीत काही साधू अघोरी विद्येची साधना करताना आढळले.
आघोरी विद्येची साधना करणारे साधू हे शैव संप्रदायातील असून, त्यांना अघोरीपंथी असेही म्हणतात. त्यांचे वास्तव्य स्मशानभूमीत असते. भितीदायक वेशभूषेमुळे सर्वसामान्य माणसे त्यांच्याजवळ जात नाही. या पंथाचे दहा तांत्रिक पीठ असून, शैव आणि शाक्त या दोन्ही संप्रदायांत अघोरी विद्या प्राप्त करणारे साधू आढळतात. स्मशानसाधना, शवसाधना आणि शिवसाधना असे त्यांच्या साधनेचे तीन प्रकार आहेत. स्मशानात वास्तव्य करणारे आम्ही साधू स्वत:साठी काही मागत नाही, तर लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो, असे वाराणसी येथून आलेले बाबा भूतनाथ यांनी सांगितले. वाराणसी-काशी येथे सर्वांत मोठ्या प्रमाणावर या साधूचे वास्तव्य आहे. स्मशानात राहून मिळेल ते खाऊन हे साधू आपला उदरनिर्वाह करतात. मायामोहाचा त्याग केल्याने त्यांना स्मशानात वैराग्य असलेले असते. स्मशानात शिवाचा वास असल्याने त्यांच्या उपासनेसाठी आम्ही येथे राहतो, असेही बाबा भूतनाथ यांनी सांगितले.

Web Title: File a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.