आयएसपी सोसायटीसाठी ११७ उमेदवारी अर्ज दाखल
By Admin | Updated: September 10, 2015 00:04 IST2015-09-10T00:03:11+5:302015-09-10T00:04:55+5:30
आयएसपी सोसायटीसाठी ११७ उमेदवारी अर्ज दाखल

आयएसपी सोसायटीसाठी ११७ उमेदवारी अर्ज दाखल
नाशिकरोड : आयएसपी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या ११ जागांसाठी होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ११७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
आयएसपी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वसाधारण-६, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती प्रत्येकी १ व महिला- २ जागा अशा ११ जागांसाठी ११ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण १२७ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत सर्व अर्ज वैध ठरले असून काही उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यानुसार ११७ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. २४ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. (प्रतिनिधी)
तारीख बदलावीमतदानाची तारीख रविवार, ११ आॅक्टोबर असून, त्या दिवशी मतदान ठेवण्यात आले आहे. मात्र रविवारी मुद्रणालयाला सुट्टी राहात असल्यामुळे मतदानाची तारीख शनिवारी १० आॅक्टोबर करण्यात यावी, अशी लेखी मागणी उमेदवार व सभासदांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.