मालेगावी सरसय्यदनगर भागात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:12 IST2021-01-18T04:12:55+5:302021-01-18T04:12:55+5:30
मालेगाव : शहरातील सरसय्यद नगर भागात हाणामारी झाली असून, याप्रकरणी पवारवाडी पोलिसात जैद, हमजा आणि अफजल (पूर्ण ...

मालेगावी सरसय्यदनगर भागात हाणामारी
मालेगाव : शहरातील सरसय्यद नगर भागात हाणामारी झाली असून, याप्रकरणी पवारवाडी पोलिसात जैद, हमजा आणि अफजल (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नफीज अहमद (४५, रा. हकीमनगर गल्ली नं. ६ घ. नं. १०३) या यंत्रमाग कामगाराने मारहाणीची फिर्याद दिली आहे. गेल्या शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हा यंत्रमागावर काम करत असताना त्याचा भाचा जुल्फीकार अली अबरार अली याला आरोपींनी शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना त्याचा राग आल्याने आरोपींनी लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत केली तर इतरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दम दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक सोनवणे करत आहेत.