सिन्नर वाचनालयासाठी प्रगती-परिवर्तन पॅनलमध्ये लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:20 IST2020-01-13T23:24:56+5:302020-01-14T01:20:55+5:30

सिन्नर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक अखेर बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. प्रगती आणि परिवर्तन पॅनलमध्ये ...

Fighting for Progress-Transformation Panel for Sinnar Library | सिन्नर वाचनालयासाठी प्रगती-परिवर्तन पॅनलमध्ये लढत

सिन्नर वाचनालयासाठी प्रगती-परिवर्तन पॅनलमध्ये लढत

ठळक मुद्देनिवडणूक : कार्यवाहपदी हेमंत वाजे बिनविरोध

सिन्नर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचीनिवडणूक अखेर बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. प्रगती आणि परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. कार्यवाहपदी हेमंत वाजे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
सत्ताधारी प्रगती पॅनलसमोर परिवर्तन पॅनलने उमेदवार उभे केले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध निवडीची परंपरा गेल्या निवडणुकीपासून खंडित झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नामदेव कोतवाल यांनी कार्यवाहपदासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने हेमंत वाजे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या काळात महिला उमेदवार अ‍ॅड. बिना सांगळे, सुनील उगले, सोनल लहामगे, किरण मूत्रक यांनी माघार घेतली. कार्यवाहपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने १२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रगती पॅनलकडून अध्यक्ष पदासाठी कृष्णा भगत, उपाध्यक्ष पदासाठी पुंजाभाऊ सांगळे व नरेंद्र वैद्य, तर संचालकासाठी राजेंद्र देशपांडे, विलास पाटील, संजय बर्वे, मनीष गुजराथी, चंद्रशेखर कोरडे, जितेंद्र जगताप, सागर गुजर, प्रज्ञा देशपांडे, निर्मल खिंवसरा हे उमेदवार रिंगणात आहेत. सदर निवडणूक लक्षवेधी ठरणार असून, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार आपले नशीब आजमावत असून, मतदार राजा कोणाला कौल देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. येत्या शुक्रवार (दि. १७) रोजी निवडणूक होत आहे.विरोधी परिवर्तन पॅनलमध्ये महिला उमेदवार बिना सांगळे यांनी माघार घेतल्यामुळे एकच महिला उमेदवार डॉ. कल्पना परदेशी तसेच कार्यवाहपदाची बिनविरोध निवड झाल्यामुळे अध्यक्षपदासाठी डॉ. जी. एल. पवार, तर उपाध्यक्षपदासाठी राजेंद्र अंकार तसेच अ‍ॅड. विलास पगार यांचे उमेदवारी अर्ज राहिले आहेत. संचालकपदासाठी नामदेव कोतवाल, डॉ. श्यामसुंदर झळके, विजय कर्नाटकी, अशोक घुमरे, अजय शिंदे, अ‍ॅड. गोपाळ बर्के यांच्यासह दहा उमेदवार परिवर्तन पॅनलने रिंगणात उतरविले आहेत.

Web Title: Fighting for Progress-Transformation Panel for Sinnar Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.