दातारनगर येथे हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:18 IST2021-01-16T04:18:54+5:302021-01-16T04:18:54+5:30
----- दुचाकीला धडक; एक ठार मालेगाव : मुंबई-आग्रा रोडवर दरेगाव शिवारात गेल्या बुधवारी (दि. १३) सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ...

दातारनगर येथे हाणामारी
-----
दुचाकीला धडक; एक ठार
मालेगाव : मुंबई-आग्रा रोडवर दरेगाव शिवारात गेल्या बुधवारी (दि. १३) सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात भरत रामदास बागुल (वय ४७) रा. कलेक्टरपट्टा हे ठार झाले. भाऊसाहेब रोडू अहिरे (३४, रा. कुकाणे) यांनी पवारवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. दुचाकी (एमएच ४१ एएच ७५९१) वरील चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून धुळ्याकडून नाशिककडे जाणाऱ्या दुचाकी (एमएच ४१ एएन ६४७८)ला धडक दिली. यात भरत बागुल यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून अनोळखी दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.