काट्याची लढत

By Admin | Updated: February 16, 2017 00:13 IST2017-02-16T00:13:00+5:302017-02-16T00:13:19+5:30

गिरणारे गट : कॉँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने

Fighting the bite | काट्याची लढत

काट्याची लढत

 गणेश धुरी ल्ल नाशिक
अर्ज माघारीनंतर गिरणारे गटातील लढतीचे चित्र काहीसे स्पष्ट झाले असून, मुख्य लढत ही राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस यांच्यातच रंगण्याची चिन्हे आहेत. परिवर्तनाची हवा निर्माण करणाऱ्या शिवसेना आणि भाजपाचे उमेदवार कशी टक्कर देतात, यावरच गिरणारे गटाचा निकाल अवलंबून राहणार आहे.
गिरणारे गटातून दोन पंचवार्षिकमध्ये निवडून आलेले सदस्य सभापती होत असल्याचा इतिहास पहिल्यांदा हिरामण
खोसकर यांना समाज कल्याण सभापतिपद मिळाल्याने सुरू झाला. तो त्या पुढील काळात लगेचच माजी आमदार कै. गंगाधर (मामा) थेटे यांचे नातू दिलीप शंकर थेटे पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडून येत त्यांना शिक्षण व आरोग्य सभापतिपद भूषविण्याची संधी लाभल्याने
कायम राहिला. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या विजयी घौडदोडीला कॉँग्रेसकडून निवडून येत सोमनाथ फडोळ यांनी ब्रेक लावत कॉँग्रेसचे खाते उघडले.
काँग्रेसच्या आणि सोमनाथ फडोळ यांच्या विजयात कै. सु. शि. दाभाडे यांच्यासह कैलास वाक्चौरे, प्रशांत बाविस्कर, हिरामण गायकर यांची महत्त्वाची भूमिका राहिली. आता सोमनाथ फडोळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कॉँग्रेसला फटका बसेल असे सुरुवातीचे चित्र होते. मात्र कॉँग्रेसच्या मंजुळाबाई गायकवाड यांच्या विजयासाठी पुन्हा हीच फळी मैदानात उतरल्याने राष्ट्रवादीची अडचण झाल्याचे चित्र आहे.४गिरणारे गटातून शिवसेनेकडून रोहिणी संपत गायकवाड, भाजपाकडून चंद्रभागा देवीदास बेंडकोळी, कॉँग्रेसकडून मंजुळाबाई किसन गायकवाड आणि राष्ट्रवादीकडून माजी सभापती हिरामण खोसकर यांच्या स्नुषा अपर्णा वामन खोसकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक चौरंगी दिसत असली तरी मुख्य लढत ही कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतच होणार आहे. त्यात स्थानिकांचा कौल भाजपा आणि शिवसेनेला कितीसा राहतो, यावर या दोन्ही पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. येथे पारंपरिक बालेकिल्ला कायम राहतो की, परिवर्तनाचे वारे वाहते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Fighting the bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.