शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

बनावट चेक व सही शिक्क्याने साडेनऊ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:35 IST

येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथे ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक येवला शाखेतून मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत खात्यावरील ९ लाख ३९ हजार रु पये बनावट धनादेश व सरपंच, ग्रामसेवक यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून परस्पर काढून घेण्यात आले. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये ग्रामसेवक नीलिमा बोरसे यांच्या तक्र ारीनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिले आहे. पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याबाबत चौकशी सुरू होती.

ठळक मुद्देयेवला तालुक्यातील घटना : माजी सरपंच व चुलत बंधूचे कृत्य

येवला : तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथे ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक येवला शाखेतून मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत खात्यावरील ९ लाख ३९ हजार रु पये बनावट धनादेश व सरपंच, ग्रामसेवक यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून परस्पर काढून घेण्यात आले. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये ग्रामसेवक नीलिमा बोरसे यांच्या तक्र ारीनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिले आहे. पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याबाबत चौकशी सुरू होती.दि. १२ जून रोजी ठेकेदार गोविंद गायके यांना त्यांच्या कामाच्या ठेक्यातून काही रक्कम अदा करायची होती. म्हणून ते धनादेश घेऊन बँकेत गेले असता खात्यावर पैसे शिल्लक नसल्याचे त्यांना समजले. त्यांनी तसे ग्रामसेवकांना सांगितले. ग्रामसेवकांनी बँक अधिकाºयांकडे याबाबत चौकशी केली असता दि. १९ जानेवारी रोजी पाच धनादेशांद्वारे ९ लाख ३९ हजार रु पये देवनाथ माधव गायके याने याच बँकेतील खात्यावर जमा केले. हे सर्व धनादेश वेगवेगळ्या तारखांना त्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे बँक अधिकाºयांनी सांगितले.सदरचे चेकबुक ग्रामपंचायतीच्या अभिलेखावरील नसल्याचे ग्रामसेवक नीलिमा बोरसे यांनी बँक अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले. सरपंच व ग्रामसेवक यांचे सही व शिक्के हेदेखील बनावट असल्याचे बोरसे यांनी निदर्शनास आणून दिले.अधिक माहिती घेतली असता बँकेच्या चेकबुक नोंदणी पुस्तिकेत माजी सरपंच प्रकाश कारभारी गायके यांनी १ आॅगस्ट २०१८ रोजी चेक क्र . १६८११ ते १६८२० व १६८२१ ते १६८३० अशी दोन चेकबुक्स बँकेकडून स्वत:च्या स्वाक्षरीने घेतलेली आहेत. ग्रामपंचायतीकडे अगोदरच काही चेक शिल्लक असताना व नवीन चेकबुकची मागणी केलेली नसतानादेखील बँकेने त्यांना चेकबुक दिले कसे? असा सवाल ग्रामसेविका बोरसे यांनी करून त्यांनी चेकबुक मागणीचा अर्ज मागितला असता अर्ज उपलब्ध नसल्याचे बँक अधिकाºयांनी सांगितले.या खात्याशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरची तपासणी केली असता सदरचा मोबाइल ग्रामसेविका बोरसे यांचा नसून दुसराच नंबर त्या खात्याशी लिंक केल्याचे आढळून आले. देवनाथ गायके यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील खात्यावर तर माजी सरपंच प्रकाश कारभारी गायके यांच्या बँक आॅफ इंडिया अंदरसूल शाखेच्या खात्यात ३ लाख ९५ हजार रु पये वर्ग केले आहेत.कडक कारवाईची मागणीग्रामसेवक बोरसे यांनी तक्र ारीत म्हटले आहे की, संशयित कागदपत्रे, चेकबुक, ग्रामसेवक व सरपंच यांचे बनावट सही, शिक्के बघता महाराष्ट्र ग्रामीण बँक येवला शाखेतील तत्कालीन काही अधिकारी व कर्मचारी तसेच देवनाथ गायके व प्रकाश गायके यांनी संगनमताने सदर शासकीय रकमेचा अपहार केल्याची शक्यता आहे. सदर घटनेबद्दल उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच वंदना डमाळे यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी