शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांच्या भरतीसाठी पंधरा हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 19:03 IST

नाशिक : शहरात सुमारे सातशे सफाई कामगार आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीकडून सध्या कामगारांची भरती सुरू आहे. तथापि, ...

ठळक मुद्देचौकशी करण्याची मागणीनगरसेवकांची तक्रार

नाशिक : शहरात सुमारे सातशे सफाई कामगार आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीकडून सध्या कामगारांची भरती सुरू आहे. तथापि, त्यासाठी ठेकेदार कंपनीने उमेदवारांकडून पंधरा हजार रुपये वसूल केले जात असल्याच्या आरोपामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहेत. अशाप्रकारे नियमबाह्य पद्धतीने वसुली सुरू असून, ठेकेदाराची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक आणि अन्य पक्षांनी केली आहे. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीने ही वैधमार्गाने घेतली जाणारी रक्कम असून, ती साहित्य सुविधा म्हणून वापरली जाणार आहे. शिवाय ती अनामत रक्कम असल्याने काम सोडणाऱ्या कामगाराला परत केली जाणार आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे शहरात सफाई कामगारांची संख्या अल्प असल्याने साफसफाईसाठी महापालिकेने तीन वर्षांसाठी आउटसोर्सिगंचे ठेका दिला आहे. या ठेकेदाराकडे आत्तापर्यंत साडेतीन हजार उमेदवारांची नावे शिफारस म्हणून आली आहेत. आत्तापर्यंत पाचशे कामगारांची भरती ठेकेदाराने पूर्ण केली आहे. मात्र, त्यातून वाद सुरू झाले आहेत. ठेकेदार प्रति उमेदवार १५ हजार रुपये आकारत असल्याची तक्रार असून, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागुल, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी केली आहे.दरम्यान, सदरची रक्कम ही अनामत रक्कम म्हणून आहे. त्यातही कंपनीमार्फत दोन गणवेश, हँडग्लोज, गम बुट आणि कचरा उचलण्यासाठी व्हील बरोज व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जीपीएस यंत्रणा यासाठी हा खर्च आहेच, परंतु कोणी कामगार आठ-दहा-पंधरा दिवसांत सोडल्यास सुरक्षितता म्हणून ही अनामत रक्कम घेतली जात आहे, असे वॉटरग्रेसचे संचालक चेतन बोरा यांनी कळवले आहे. संबंधित कामगारांनी काम सोडल्यास त्यांना पूर्ववत ती रक्कम परत दिली जाणार असल्याचेदेखीलही बोरा यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाLabourकामगार