चांदवडला दोन दिवसांत पंधरा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:15 IST2020-08-21T22:58:25+5:302020-08-22T01:15:49+5:30
चांदवड : तालुक्यात दोन दिवसांत पंधरा रुग्ण मिळून आले आहेत. बुधवारी आठ, तर गुरुवारी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

चांदवडला दोन दिवसांत पंधरा रुग्ण
चांदवड : तालुक्यात दोन दिवसांत पंधरा रुग्ण मिळून आले आहेत. बुधवारी आठ, तर गुरुवारी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात वाहेगावसाळ येथील ६६ व ३८ वर्षीय पुरुष, पाटे येथील ४७ वर्षीय पुरुष, चांदवड शहरातील २८ व ४२ वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय महिला शिंगवे येथील १८ वर्षीय तरुण, उसवाड येथील महिला अशा आठ जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात निमोण येथील दोन ३० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला.