तरुणावर प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: September 20, 2016 01:00 IST2016-09-20T00:59:19+5:302016-09-20T01:00:19+5:30

तरुणावर प्राणघातक हल्ला

Fierce attack on the youth | तरुणावर प्राणघातक हल्ला

तरुणावर प्राणघातक हल्ला

नाशिक : दिंडोरीरोडवर एका टोळक्याने तिघांना बेदम मारहाण करून एकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़१५) रात्रीच्या सुमारास गजानन चौकात घडली़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली आहे़
पंचवटी पोलीस ठाण्यात मंगेश मधुकर बागुल (रा. गजानन चौक, दिंडोरीरोड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो, अजित शशिकांत खिच्ची (रा. फुलेनगर) व पप्पू कारभारी शिराळ, असे तिघे सायंकाळी सातच्या सुमारास फुलेनगरमधील गजानन चौकात गप्पा मारत होते़ त्यावेळी संशयित किरण दिलीप बागुल (२२, मेरी पाट, दिंडोरीरोड), रवि सर्जेराव जाधव (१९, रा. मेरीपाट, दिंडोरीरोड), सोनू बाळू खंडीझोळे (१९, रा. दिंडोरीरोड), आकाश अशोक जाधव (२०, रा. दिंडोरीरोड), आकाश संजय गदावी (२१, रा. वज्रेश्वरी नगर) हे चौघे तिथे आले व त्यांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. यामध्ये अजित खिच्चीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला़ याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Fierce attack on the youth