चिमुकल्या खेळाडूंचा सत्कार
By Admin | Updated: January 7, 2016 23:17 IST2016-01-07T22:54:13+5:302016-01-07T23:17:56+5:30
कौतुक : अतिदुर्गम भागातील मुलींची राष्ट्रीय पातळीवर झेप

चिमुकल्या खेळाडूंचा सत्कार
पेठ : नाचलोंढीहे पेठ व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारे दोन्ही तालुक्यांसाठी सर्वाधिक अतिदुर्गम गाव़ या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या निर्मला व वर्षा चौधरी या दोन भगिनींनी रांची झारखंड येथील राष्ट्रीय खेळकूद क्रीडा स्पर्धेत देशपातळीवर पहिला क्रमांक मिळवला आणि सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत हिच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या या मुलींचा संपूर्ण गावकऱ्यांनी केलेला हृद सत्कार इतर कोणत्याही बड्या सत्कार समारंभाला लाजवणारा ठरला़
नाचलोंढीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक भगवान हिरकूड यांनी या मुलींच्या अंगी असलेल्या गुणांची पारख करण्याबरोबरच या परिसरातील डोंगरदऱ्यात पहाटे स्वत: मुलांबरोबर धावण्याचा सराव केला़ यामुळे अतिशय खडतर परिस्थितीत झालेला सराव या भगिनींना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा जिंकताना कामी आला़
नाचलोंढी येथील प्राथमिक शाळेत या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला़ यावेळी शिक्षण समिती सदस्य भास्कर गावित, सभापती जयश्री वाघमारे, उपसभापती महेश टोपले, माजी सभापती अंबादास चौरे, पंचायत समिती सदस्य मंदा चौधरी, गटविकास अधिकारी बी़ बी़ बहिरम, गटशिक्षणाधिकारी के. बी़ माळवाळ आदि उपस्थित होते़ यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने एक हजार रुपये, तंटामुक्त गाव समितीच्या वतीने एक हजार रुपये, गटशिक्षणाधिकारी के. बी. माळवाळ यांच्याकडून एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक या मुलींना प्रदान करण्यात आले़ आदिवासी भागातील मुलांमधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास पेठ तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होऊ शकतील असे जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांनी सांगितले़ उपसभापती महेश टोपले, गटविकास अधिकारी बहिरम, गटशिक्षणाधिकारी माळवाळ आदिंनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी प्रशिक्षक भगवान हिरकूड, माया भोये यांच्यासह निर्मला व वर्षा यांच्या पालकांचाही गौरव करण्यात आला़
याप्रसंगी सरपंच कुसुम चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव चौधरी, पोलीसपाटील केशव बोरसे, उपसरपंच तुकाराम चौधरी, विस्तार अधिकारी मनीषा पिंगळकर, तुळशीराम वाघमारे, रामदास महाले, प्रकाश भोये, दिलीप चौधरी, कैलास चौधरी, प्रकाश तुंगार, मुख्याध्यापक आऱपी़ सुपारे, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामदास शिंदे, केंद्रप्रमुख संजीव शेवाळे, वानखेडे, ग्रामसेवक अविनाश पाटील, शिक्षक गायकवाड, उमाकांत घुटे, चौधरी, भोये यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ सीताराम चौधरी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले़