शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुळाणे येथे डोंगऱ्या देव उत्सवास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:46 IST

वरखेडा : उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशित असलेल्या दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे डोंग-या देव उत्सवात सुरूवात झाली असून पारंपारिक पद्धतीने विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमार्गशीर्ष पौर्णिमेला सांगता : आदीवासी भागात वातावरणात उत्साह

वरखेडा : उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशित असलेल्या दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे डोंग-या देव उत्सवात सुरूवात झाली असून पारंपारिक पद्धतीने विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.आदिवासींच्या जीवन संघर्षाच्या वाटचालीत परंपरागत चालत आलेल्या सामुदायिक उत्सवांना, व्रतांना जपण्याचे काम आदिवासी समाज आजही मनोभावे करीत आहे. डोंगऱ्यादेव हे आदिवासींचे अतिशय खडतर व तितकेच महत्वाचे व्रत मानले जाते. हे व्रत आदिवासींच्या विविध जमातीपैकी प्रामुख्याने कोकणा, महादेवकोळी, भिल्ल, वारली, पावरा, मावची आदी जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात साजरा करतात. डोंगऱ्यादेव हे व्रत सामुदायिकरित्या पार पाडणारे नाशिक जिल्ह्यातील कळवण, पेठ, सुरगाणा, बागलाण, दिंडोरी, ईगतपूरी व त्रंबकेश्वर हे आदिवासी तालुके आहेत. सालाबादा प्रमाणे या वर्षीही सर्वत्र डोंगऱ्यादेव या व्रताच्या कार्यक्रमास नुकतीच सुरुवात झाली आहे.महिनाभरापासून तयारीप्रत्येक गावाच्या अगर विभागाच्या प्रथेनुसार आदिवासी डोंगऱ्यादेव हे व्रत तीन किंवा पाच वर्षांनी पाळतात. नियोजित वर्षाच्या मकशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला हे व्रत सुरु होते, आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते. साधारणतः पंधरा दिवस पाळले जाणारे हे व्रत आदिवासी अलीकडे आठ ते दहा दिवसच पाळतात. ज्या गावात हे व्रत असते त्या गावातील आदिवासी या व्रताची महिनाभरापासून तयारी करतात.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSocialसामाजिक