जादा दराने खत विक्री;

By Admin | Updated: August 31, 2014 00:55 IST2014-08-29T00:23:36+5:302014-08-31T00:55:23+5:30

तीन विक्रेत्यांचे परवाने निलंबित तालुका खरेदी संघालाही बजावली नोटीस

Fertilizer sales at higher rates; | जादा दराने खत विक्री;

जादा दराने खत विक्री;

 नाशिक : शेतकऱ्यांना जादा दराने खते विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाने जिल्'ातील तीन खत विक्रेत्यांचे परवाने तडकाफडकी निलंबित केले असून, निफाड तालुका शेतमाल खरेदी विक्री व प्रक्रिया सहकारी संस्थेलाही कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे यांनी दिली. विशेष म्हणजे, यासंदर्भात कालच गुरुवारी (दि. २८) ‘लोेकमत’ने ‘युरियाचा काळा बाजार जोरात’ या मथळ्याखालील वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. २९८ रुपयांची युरिया खताची गोणी शेतकऱ्यांना चक्क ३५० रुपये चढ्या दराने विक्री करण्यात येत असल्याबाबत लक्ष वेधले होते. कृषी विभागाने याबाबत कडक भूमिका घेण्याची मागणीही चांदवडचे कॉँग्रेस तालुकाध्यक्ष शंकरराव गांगुर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली होती.

Web Title: Fertilizer sales at higher rates;