दापूर, पांढुर्ली येथे खत विक्री केंद्र

By Admin | Updated: November 16, 2015 22:03 IST2015-11-16T22:02:37+5:302015-11-16T22:03:51+5:30

खरेदी-विक्री संघ : माफक दरात दर्जेदार खते

Fertilizer sales center at Dapoor, Whitehurli | दापूर, पांढुर्ली येथे खत विक्री केंद्र

दापूर, पांढुर्ली येथे खत विक्री केंद्र

 सिन्नर : येथील सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने दापूर व पांढुर्ली येथे खत विक्री केंद्रांची सुरुवात करण्यात आली. गुरुवारी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते फीत कापून दोन्ही खत विक्री केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले.
खरेदी-विक्री संघाची नाळ थेट शेतकऱ्यांशी जोडलेली असल्यामुळेच शेतकऱ्यांच्या सेवेसाठी संघाने खत विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या खत विक्री केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माफक दरात दर्जेदार खते पुरविण्यात येणार असल्याचे वाजे यांनी यावेळी सांगितले. दापूर आणि पांढुर्लीनंतर आता तालुक्यातील महत्त्वाच्या गावांतही संघाच्या माध्यमातून खत विक्री केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या केंद्रांमध्ये शेतकीची पदवी घेतलेल्या तज्ज्ञांची नियुक्ती करून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच शेतकऱ्यांना योग्य खते पुरविण्याचा मनोदय वाजे यांनी यावेळी व्यक्त केला. खत विक्री केंद्रांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्यासह संघासही आर्थिक बळकटी मिळणार असल्याचे ते म्हणाले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाचे सभासद होण्याचे आवाहन वाजे यांनी यावेळी केले.
पंचायत समितीचे गटनेते उदय सांगळे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे, उपाध्यक्ष दत्तू आव्हाड, संचालक नितीन अढांगळे, मोहन काकड, रघुनाथ बरकले, शांताराम ढोकणे, बाबूराव मोजाड यांचीही यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी खरेदी-विक्री संघाचे संचालक भाऊसाहेब तांबे, कचरू गंधास, बाळासाहेब जुंधारे, फकीरराव हिरे, छबू थोरात, वसंत आव्हाड, नामदेव सांगळे, आर. आर. जाधव, निशाताई वारुंगसे नगरसेवक विजय जाधव, शैलेश नाईक, प्रमोद चोथवे, मनोज भगत, शिवाजी गाडे, जगन्नाथ खैरनार, नामदेव वाजे, अरुण वारुंगसे, सोमनाथ तुपे, विश्राम शेळके, कारभारी हारक, रामनाथ बरकले, विनायक हगवणे, कैलास वाजे, विकास वाजे, तुषार मोजाड, सूरज वाजे, विनोद भालेराव, पंढरी ढोकणे, नारायण वाजे, पिराजी पवार आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष दत्तू आव्हाड, संचालक सुकदेव वाजे यांनी स्वागत केले. (वार्ताहर)

Web Title: Fertilizer sales center at Dapoor, Whitehurli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.