भरधाव ट्रकने एकास चिरडले
By Admin | Updated: July 3, 2017 18:53 IST2017-07-03T18:53:48+5:302017-07-03T18:53:48+5:30
भरधाव ट्रकने एकास चिरडल्याची घटना विल्होळीजवळील गौळाणे फाट्याजवळ शनिवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास घडली़ मयत इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही़.

भरधाव ट्रकने एकास चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भरधाव ट्रकने एकास चिरडल्याची घटना विल्होळीजवळील गौळाणे फाट्याजवळ शनिवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास घडली़. मयत इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही़.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आसाराम शिवाजी किरमे (२५) हा भरधाव ट्रक (एमएच ४१, ए २२५२) घेऊन जात होता़ गौळाणे फाट्याजवळ त्याच्या मागच्या चाकाखाली चिरडून अज्ञात इसमाचा मृत्यू झाला़ या इसमाची ओळख पटलेली नसून अंबड पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे़
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ट्रकचालक किरमेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़