महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 22:40 IST2017-08-08T22:40:41+5:302017-08-08T22:40:48+5:30

Female swine flu death |  महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

 महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू



लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक :
जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास घडली़ सुलोचना दत्तात्रय रकिबे असे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, त्या निफाड तालुक्यातील धोडंबे येथील रहिवासी आहेत़ या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा या रोगाने डोके वर काढल्याचे समोर आले आहे़
सुलोचना रकिबे यांना ८ आॅगस्ट रोजी स्वाइन फ्लूसदृश आजारामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्यांचा प्रयोगशाळेतील चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला़ निफाड तालुक्यातीलच एका व्यक्तीचा जुलैमध्ये स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़ सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात ४ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यामध्ये तीन पुरुष व एक महिला आहे़.

 

Web Title: Female swine flu death