महिला पोलीस अधिकाऱ्याची छेड

By Admin | Updated: December 25, 2015 23:33 IST2015-12-25T23:21:58+5:302015-12-25T23:33:46+5:30

नाशिकरोड : वर्धा जिल्ह्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या गर्भवती महिला पोलीस उपनिरीक्षकेची

Female police officer's tort | महिला पोलीस अधिकाऱ्याची छेड

महिला पोलीस अधिकाऱ्याची छेड

नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेर छेडछाड करत विनयभंग करणाऱ्या नेहरूनगर येथील युवकाविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी संबंधित महिलेने आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगुनही त्याने दादागिरी करत अंगाशी छेडछाड करू लागला. त्यावेळी संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षक व तिची बहीण यांनी विरोध केला असता रंजन पगारे याने त्यांना मारहाण करून शिवीगाळ करू लागला. यामुळे घाबरलेली लहान मुले रेल्वेस्थानकात पळाली. तर जमलेल्या बघ्यांमधून एकहीजण मदतीला धावला नाही. लहान मुलांनी रेल्वे पोलिसांना आपल्या आईला एकजण मारत असल्याचे सांगितल्यावर रेल्वे पोलीस बाहेर पळत आले. यावेळी पगारे हा रेल्वे क्वार्टर परिसरात जाऊन लपला. रेल्वे पोलिसांनी त्याला शोधून नाशिकरोड पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

संशयित ताब्यात
आष्टी पोलीस ठाण्यातील गर्भवती महिला पोलीस उपनिरीक्षक या २८ डिसेंबर रोजी नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये होणाऱ्या रिपीटरची परीक्षा देण्यासाठी दोन मुले, बहीण व तिची दोन लहान मुले असे नंदीग्राम एक्स्प्रेसने गुरूवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरले. सर्वजण रेल्वे स्थानकाबाहेरील बापू हॉटेलजवळ एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले असता संशयित रंजन संजय पगारे (नेहरूनगर) याने छेडछाड केली.

Web Title: Female police officer's tort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.