महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

By Admin | Updated: March 9, 2017 02:08 IST2017-03-09T02:08:05+5:302017-03-09T02:08:19+5:30

नाशिक : पोलिसाची नोकरी व कुटुंब यांची यशस्वीपणे सांगड घालून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्तालयात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला़

Felicitation of women police officers and employees | महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

 नाशिक : पोलिसाची नोकरी व कुटुंब यांची यशस्वीपणे सांगड घालून उल्लेखनीय कार्य अर्थात गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास, खेळातील नेत्रदीपक कामगिरी, समुपदेशनाद्वारे मोडणारे संसार वाचविणे याबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्तालयात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला़ निमित्त होते जागतिक महिला दिनाचे़ दरम्यान, सकाळी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची बाइक रॅली तर दुपारी इनडोअर शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़
पोलीस आयुक्तालयातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ‘जागर स्त्री शक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे वरिष्ठांसमोर सादरीकरण केले़ त्यामध्ये काहींनी गायन, वादन, नृत्य सादर केले तर काहींनी महिला सबलीकरण व स्त्रीशक्तीविषयावर संवाद साधला़
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गिर्यारोहक कृष्णा पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त हरविंदर कौर, शांती राधाकृष्णन बी, दीपाली खेडकर, जया ढवले यांसह उपायुक्त दत्तात्रय कराळे, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Felicitation of women police officers and employees