राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा सत्कार

By Admin | Updated: January 2, 2016 23:23 IST2016-01-02T23:00:12+5:302016-01-02T23:23:58+5:30

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा सत्कार

Felicitates President's award-winning teachers | राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा सत्कार

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा सत्कार

नाशिक : बागलाण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मोरेनगर शाळेचे सोपान गोकुळ खैरनार आणि देवळा तालुक्यातील पिंपळगाव (वा.)
शाळेचे शिक्षक देवीदास शेवाळे या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यात आला.
या दोन्ही शिक्षकांची नाशिक विभागातून २०१४-१५ सालासाठी राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाली होती. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, विस्तार आधिकारी एम. बी. सूर्यवंशी, बागलाणचे गटशिक्षणाधिकारी पी. आर. जाधव, पी. आर. देवरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Felicitates President's award-winning teachers