भाजपाच्या वतीने वैद्यकीय व्यावसायिकांचा सत्कार

By Admin | Updated: July 3, 2017 01:59 IST2017-07-03T01:45:44+5:302017-07-03T01:59:43+5:30

नाशिक : डॉक्टरांनी रुग्णांचा विश्वास संपादन करून आपुलकीचे नाते निर्माण करावे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.

Felicitates medical professionals on behalf of BJP | भाजपाच्या वतीने वैद्यकीय व्यावसायिकांचा सत्कार

भाजपाच्या वतीने वैद्यकीय व्यावसायिकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : डॉक्टर आणि रुग्ण यांचे संबंध सौहार्दाचे असणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी रुग्णांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करावे, असे प्रतिपादन भाजपाचे महानगराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.
भाजपाच्या वैद्यकीय आघाडीतर्फे ‘डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्यावेळी सानप बोलत हाते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, तसेच प्रशांत जाधव, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, डॉ. अभय गुजर, डॉ.दीपाली कुलकर्णी, नितीन क्षीरसागर, दामोदर मानकर आदी होते.
डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपा सरकाराच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देऊन गरिबांना रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे, असेही ते पुढे म्हणाले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून डॉक्टरांनी रु ग्णांशी आपुलकीचे नाते करावे, अशी सूचना लक्ष्मण सावजी यांनी केली. डॉक्टरांवरील हल्ले ही चिंतेची बाब असल्याचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले. डॉक्टर आणि रुग्णांत सातत्याने संवाद होणे गरजेचे आहे, असे डॉ. नितीन गडकरी म्हणाले. डॉ.शरद कुलकर्णी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्तविक डॉ. चंद्रशेखर नामपूरकर यांनी केले, तर आभार डॉ.अजय गुजर यांनी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन झाले. यावेळी नंदकुमार देसाई, सुजाता करजगीकर, भारती बागुल, सोनल दगडे, डॉ.मानसी सूर्यवंशी, डॉ.दिलीप सोनवणे, डॉ.वैभव जोशी, संजय गालफाडे, गौरव साबळे, प्रशांत हिरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Felicitates medical professionals on behalf of BJP