लखमापूर ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

By Admin | Updated: September 12, 2016 00:57 IST2016-09-12T00:49:09+5:302016-09-12T00:57:06+5:30

लखमापूर ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

Felicitated by Lakhmapur Gram Panchayat | लखमापूर ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

लखमापूर ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

 दिंडोरी : पूर्वापारपासून गुरूला आदराचे स्थान असून, अजूनही ग्रामीण भागात गुरूंना चांगला मान मिळत आहे याचे उदाहरण म्हणजे दिंडोरी तालुक्यातील लखमापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी शनिवार, दि. १० रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने लखमापूर येथील
कादवा इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद शाळेतील प्राचार्य, सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला.
यावेळी त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडून
विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मंगला सोनवणे होत्या. व्यासपीठावर कादवाचे संचालक निंबाजीअप्पा देशमुख, प्राचार्य के. के. अहिरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार, बी. के. कावळे विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण महाडिक, केंद्रप्रमुख अशोक
गांगुर्डे, पदवीधर आदर्श शिक्षक रमेश मोरे, स्कॉलरशिप पुस्तकाचे
लेखक बी. जी. वाणी, उपसरपंच वाल्मीक मोगल, ग्रामपंचायत सदस्य व शालेय समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून लखमापूर ग्रामपंचायतीचे कौतुक करून आदर्श उपक्रम असल्याचे सांगितले.
यावेळी मागील वर्षी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच प्रमुख अतिथी जिल्हा परिषद शाळेचे आणि कादवा इंग्लिश स्कूलचे प्राचार्य, सर्व शिक्षक, कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांना ग्रामपंचायतीच्या वतीने भेटवस्तू, शाल, पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन जोंधळे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Felicitated by Lakhmapur Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.