मालेगाव वीजकंपनी कर्मचाऱ्यांचा सत्कार
By Admin | Updated: October 29, 2014 22:39 IST2014-10-29T22:39:42+5:302014-10-29T22:39:53+5:30
मालेगाव वीजकंपनी कर्मचाऱ्यांचा सत्कार

मालेगाव वीजकंपनी कर्मचाऱ्यांचा सत्कार
मालेगाव : येथील बारा बंगला भागातील मालेगाव युवा संघटनेतर्फे दीपावली सणकाळात शहरपरिसरात भारनियमन न करणाऱ्या वीजकंपनी कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन अभिनव पध्दतीने सत्कार करण्यात आला. वीजकंपनीने सणउत्सवाचे महत्त्व लक्षात घेता नागरिकांच्या आनंदावर विरजण पडू दिले नाही. म्हणून ते अभिनंदनास पात्र आहे असे संघटनेने म्हटले आहे. यावेळी देवा पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.