सरसंघचालक मोहन भागवत आज नाशिकमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:52 IST2019-11-21T00:52:13+5:302019-11-21T00:52:35+5:30
राष्टय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे खासगी दौऱ्यानिमित्ताने गुरुवारी (दि.२१) नाशिकमध्ये येत आहेत. भोसला स्कूल येथे होणाºया एका कार्यक्रमात ते सहभागी होणार असून, शहरातील काही खासगी कार्यक्रमांनादेखील ते हजेरी लावणार आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत आज नाशिकमध्ये
नाशिक : राष्टय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे खासगी दौऱ्यानिमित्ताने गुरुवारी (दि.२१) नाशिकमध्ये येत आहेत. भोसला स्कूल येथे होणाºया एका कार्यक्रमात ते सहभागी होणार असून, शहरातील काही खासगी कार्यक्रमांनादेखील ते हजेरी लावणार आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत हे दि. २० रोजी दुपारी २ वाजता नागपूरहून नाशिकसाठी रेल्वेने निघतील. रात्री १२.३० वाजता त्यांचे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आगमन होणार आहे. सातपूर येथे त्यांच्या निकटवर्तीयांकडे त्यांचा मुक्काम असून दुसºया दिवशी ते शहरातील काही कार्यक्रमांना औपचारिक उपस्थित राहणार आहेत. भोसला मिलिटरी स्कूल आवारात होणाºया संघाच्या कार्यक्रमासाठी ते विशेषत्वाने उपस्थित राहणार असल्याचे समजते.
गुरूवार, (दि. २१) सायंकाळी ५ वाजता कृषीनगर येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार असून, तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुल येथील कार्यक्रमासही ते उपस्थित राहणार आहेत. दि. २४ रोजी रात्री रेल्वेने नागपूरकडे रवाना होतील. दरम्यान , रात्री त्यांचे नाशिकरोड स्थानकावर आगमन झाले. तत्पुर्वी नाशिकरोड रेल्वेस्थानकात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांच्या आगमनापूर्वी श्वान पथकाच्या सहाय्याने परिसर पिंजून काढला. पोलिसांनी संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. भागवत हे सातपूरला मुक्कामी असल्याने तेथेही बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.