कोयत्याचा धाक दाखवून कॅमेरा पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST2021-07-21T04:12:07+5:302021-07-21T04:12:07+5:30

याबाबत अजय सुरेश आहेर (रा. अंबड, पाथर्डी रोड) याने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रात्री आठ वाजेच्या ...

Fearing for his life, he snatched the camera | कोयत्याचा धाक दाखवून कॅमेरा पळविला

कोयत्याचा धाक दाखवून कॅमेरा पळविला

याबाबत अजय सुरेश आहेर (रा. अंबड, पाथर्डी रोड) याने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रात्री आठ वाजेच्या सुमारास आहेर व त्याचा मित्र नितीन चोथे समवेत फोटोसेशन करत असताना ॲक्टिवा दुचाकीने (एमएच १५ जीवाय८४९६) आलेल्या दोघा संशयितांनी ‘आम्हालाही फोटोसेशन करायचे आहे...’ असे सांगून आहेर यास थांबवून ठेवले. त्यानंतर संशयितांनी त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले. दुचाकीने आलेल्या साथीदारांपैकी एकाने त्याच्या हातातील कोयता आहेरच्या गळ्याला लावला, तर दुसऱ्याने चोथे याच्या हाताला चाकू लावून गळ्यात असलेली बॅग बळजबरीने हिसकावून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बॅगमध्ये काळ्या रंगाचा निकॉन ३३०० डी हा कॅमेरा व ७०/३०० एमएम निकॉन लेन्स आणि १८/५५ एमएम लेन्स असा एकूण २२ हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला आहे.

Web Title: Fearing for his life, he snatched the camera