खंबाळे तलावात युवक बुडाल्याची भीती

By Admin | Updated: July 9, 2017 23:54 IST2017-07-09T22:52:21+5:302017-07-09T23:54:49+5:30

घोटी : खंबाळे येथील तलावात युवक बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Fear of youth drowning in Khambale lake | खंबाळे तलावात युवक बुडाल्याची भीती

खंबाळे तलावात युवक बुडाल्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : खंबाळे येथील लघु पाटबंधारे तलावात रविवारी दुपारी अंघोळ करण्यासाठी गेलेला एक युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या युवकाचा आठ तास शोध घेवूनही शोध लागला नसल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खंबाळे येथील डहाळेवाडी येथील अक्षय वालू खाडे (१९) हा युवक आपल्या मित्रांसह लगतच्या तलावावर अंघोळ करण्यासाठी गेला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो दुपारी १ वाजेच्या सुमारास पाण्यात बुडाला.दरम्यान, युवक बुडाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी घोटी पोलीस स्टेशनला कळविली. यानुसार घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, हवालदार सुहास गोसावी, धर्मराज पारधी आदी घटनास्थळी पोहचले. बुडालेल्या युवकाचा स्थानिक युवकाच्या मदतीने शोध घेतला पण उशिरापर्यंत यश आले नाही.घोटी परिसरातील खंबाळे तलावात युवक बुडाल्याच्या भीतीमुळे शोध घेणारे पथक.

Web Title: Fear of youth drowning in Khambale lake