लखमापूर परिसरात बिबट्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:23 IST2020-06-07T21:28:52+5:302020-06-08T00:23:08+5:30
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, दहेगाव, म्हेळुस्के, ओझे, परमोरी, अवनखेड, करजंवण आदी भागात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत असल्याने परिसरात दहशतीचे वातवरण आहे.

लखमापूर परिसरात बिबट्याची भीती
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, दहेगाव, म्हेळुस्के, ओझे, परमोरी, अवनखेड, करजंवण आदी भागात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत असल्याने परिसरात दहशतीचे वातवरण आहे.
वनविभागाने काही ठिकाणी पिंजरा लावून काही बिबट्यांना जिवाचे रान करून जेरबंद केले आहे, परंतु आजही काही भागात रात्रीच्या वेळेस नागरिकांना बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे.
सध्या ग्रामीण भागात कोरोनाच्या रोगावर मात करण्यासाठी सर्वच जनता लॉकडाऊनच्या माध्यमातून भरपूर मेहनत घेत आहेत. त्यात बहुतेक गावांना यश पण मिळत आहे. त्यामुळे आजही तालुक्यातील बरीच गावे कोरोनामुक्त आपणाला पाहायला मिळत आहे, परंतु नागरिकांमध्ये कोरोना आणि बिबट्याची भीती दिसून येत आहे.