शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

फौजिया खान : सरकारची धोरणे अराजकता पोसणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 20:11 IST

चौथा स्तंभ असलेले प्रसारमाध्यमेही या सरकारने गिळंकृत के ली. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाची नारीशक्ती एकवटली आहे.

ठळक मुद्दे ‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानसरकारने संविधानाची मुल्ये पायदळी तुडवून अस्थिरतेचे वातावरण निर्माण केल्याची टीका

नाशिक : देशाचे सध्याचे सरकार व त्यांची धोरणे ही अराजकता पोसणारी आहेत. त्यामुळे लोकशाहीचा केवळ श्वास गुदमरतोय असे नाही तर ती मृतावस्थेत पोहचली आहे. सरकारने संविधानाची मुल्ये पायदळी तुडवून अस्थिरतेचे वातावरण निर्माण केल्याची टीका माजी मंत्री व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्ष फौजिया खान यांनी केली.‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानांतर्गत उत्तर महाराष्ट्रच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी भवन येथे बुधवारी (दि.८) पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार विजया चव्हाण, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना महाले, महिला आघाडीच्या प्रेरणा बलकवडे, समीना मेमन, सुषमा पगारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी खान म्हणाल्या, माजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती सुधारल्यानंतर संपुर्ण उत्तर महाराष्ट्रचे मिळून नाशिकमध्ये महिला आघाडीच्या वतीने ‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानांतर्गत ‘इव्हीएम’ यंत्र व मनुस्मृतीची होळी करुन सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. या सत्ताधारी भाजपा सरकारने लोकशाहीची हत्त्या केली असून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष विरोधक म्हणून ही हत्त्या कदापी सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ’ असा आमचा नारा आहे. गुन्हे यापुर्वीदेखीलही घडत होते, मात्र सध्या गुन्हे करणा-या गुन्हेगारांना हे सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या सरकारने लोकशाहीचे सर्व स्तंभ असुरक्षित केले आहे. चौथा स्तंभ असलेले प्रसारमाध्यमेही या सरकारने गिळंकृत के ली. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाची नारीशक्ती एकवटली आहे.निवडणुकांचे निकाल फिरतात कसे?देशातील व राज्यामधील प्रत्येक समाज व बसचालक-वाहकांपासून शेतकºयांपर्यंत आणि शासकिय कर्मचाºयांपासून शिक्षकांपर्यंत सर्वच घटक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत असताना हे सरकार निवडणुकांमध्ये कसे जींकून येते? निवडणुकांचे निकाल कसे फिरतात? लोकशाहीमध्ये असे कधीही घडत नाही, सरकार ईव्हीएम हॅकींगद्वारे हे घडवून आणत असल्याचा गंभीर आरोप खान यांनी यावेळी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकारdemocracyलोकशाहीNarendra Modiनरेंद्र मोदी