मुलाकडून बापाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 02:07 PM2020-02-18T14:07:11+5:302020-02-18T14:07:30+5:30

सायखेडा : निफाड शहरालगत असलेल्या सोनेवाडी बुद्रूक येथे बबन निरभवणे या तरु णाने दारूच्या नशेत वडिलांच्या डोक्यात कु-हाडीने वार ...

 Father's murder by son | मुलाकडून बापाचा खून

मुलाकडून बापाचा खून

Next

सायखेडा : निफाड शहरालगत असलेल्या सोनेवाडी बुद्रूक येथे बबन निरभवणे या तरु णाने दारूच्या नशेत वडिलांच्या डोक्यात
कु-हाडीने वार करत खून केल्याची घटना घडली. यामध्ये निवृत्ती निरभवणे (७३) यांचा मृत्यू झाला आहे.
सोनेवाडी येथील कमलेश निर्भवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री त्यांचा भाऊ बबन हा दररोज दारू पिऊन घरी आला. त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी पंधरा दिवसापासून दोन मुलांना घेऊन माहेरी गेली होती . ती नुकतीच माहेरून परत आली होती, मात्र बबन रात्री दारू पिऊन घरी आल्यावर तू का गेली अस म्हणत तिच्या अंगावर हातातील कुºहाड घेऊन धावला. पत्नीला मारणार इतक्यात आई आणि वडील मध्ये पडून त्याला दूर लोटत तिला मारू नको असे सांगत होते. मात्र दारूच्या नशेत असलेला बबन कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. उलट तो वडिलांना म्हणाला की, माझी बायको व मुले माहेरी गेले, त्यास जबाबदार तुम्ही आहेत अस म्हणत वाद घालण्यास सुरवात केली. हातातील कुºहाड वडील निवृत्ती यांच्या डोक्यात घातली. वार बसताच वडील जागीच कोसळले. आम्ही वडिलांना मारू नको अस म्हणत असतांना तो तेथून पळाला, मात्र तोपर्यंत वडिलांचा मृत्यू झाला. अशी माहिती फिर्यादी कमलेश निरभवणे यांनी निफाड पोलीस ठाण्यात रात्री दिली. त्यानंतर पोलीस हवालदार राऊत,सांगळे, शिपाई घुगे काळे यांनी रात्री उशिरा आरोपीला सोनेवाडी शिवारातून अटक केली. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वडिलांच्या डोक्यात कुर्हाड घातल्याची कबुली दिली. (१८ सायखेडा १)

Web Title:  Father's murder by son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक