शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून बापाने आवळला मुलाचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:43 IST

पित्याने दीड एकर शेती प्रेयसीच्या नावावर केल्याने त्यास मुलाने विरोध केल्याने पित्याने  २८ वर्षीय तरुण मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना  नाशिक-पुणेरोडवरील वैद्यनगर येथे घडली. याप्रकरणी संशयित पशुवैद्यकीय अधिकारी प्रभाकर माळवाड यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देवैद्यनगर येथील घटना :  आईने घेतली पोलिसांकडे धावसंशयित पित्याला ठोकल्या बेड्या

नाशिक : पित्याने दीड एकर शेती प्रेयसीच्या नावावर केल्याने त्यास मुलाने विरोध केल्याने पित्याने  २८ वर्षीय तरुण मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना  नाशिक-पुणेरोडवरील वैद्यनगर येथे घडली. याप्रकरणी संशयित पशुवैद्यकीय अधिकारी प्रभाकर माळवाड यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जनरल वैद्यनगर परिसरात राहणारे देवळा पशुसंवर्धन दवाखान्यातील पशुवैद्यक संशयित प्रभाकर माळवाड व त्यांचा मुलगा निलेश माळवाड आणि फिर्यादी आई जयश्री यांनी रविवारी (दि.३) रात्री सोबत जेवण केले. यावेळी मुलगा निलेश याने वडिलांना ‘पोल्ट्री फार्म सुरू करून द्या’ असे सांगितले. यावेळी त्यांच्यात वाद होऊन हमरी-तुमरी झाली. ‘तू काही कामाचा नाही, त्यामुळे मी तुला काहीही देणार नाही, असे म्हटल्याने वाद विकोपाला गेला.मयत नीलेश यांच्या आईने मध्यस्थी करीत भांडण मिटविले. माळवाड दाम्पत्य त्यांच्या खोलीत झोपले व मुलगा निलेश हा त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास निलेश याचा ओरडण्याचा आवाज कानी आल्याने त्याची आई मदतीला धावली. यावेळी प्रभाकर यास त्यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पत्नीला ढकलून देत निलेश (२८) यास गळा दाबून ठार केले, असे फिर्याद त्यांनी पोलिसांत दिली.याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रभाकर यास अटक केली असून जयश्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध खुुनाचा गुन्हा दाखल केला आहे.सलग दोन घटनांनी शहर सुन्नजन्मदात्या पित्याने ‘आज तुला संपवूनच टाकतो’ असे म्हणत मुलगा साखरझोपेत असताना त्याच्या छातीवर बसून गळा आवळून ठार केल्याच्या घटनेने पित्याच्या नात्याला काळिमा फासला गेला. काही दिवसांपूर्वीच आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने एका चिमुकल्याचा काटा काढल्याची घटना शहरात उघडकीस आली होती. या दोन्ही घटना शहरात लागोपाठ घडल्याने आई-वडिलांच्या नात्याची प्रतिमाही जनमानसात मलीन झाली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी