शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस जावयाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी सासऱ्याचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 01:49 IST

दोन दिवसापूर्वी पोलीस जावायाने पत्नीसह सासू - सासऱ्यावर चाकूने हल्ला केल्याने तिघेही गंभीर जखमी झाले होते. दरम्यान सासरे निवृत्ती दामोदर सांगळे (52) रा. दोडी ता. सिन्नर यांचे उपचारादरम्यान रविवारी सकाळी निधन झाले. मुलीला वाचवण्यासाठी अंगावर चाकूचे वार झेलत जखमी झालेल्या पित्याने मृत्यूशी झुंज दिली पंरतु तीस तास झुंज देऊनही अखेर पित्याला मृत्यूने कवटाळले असून पत्नी व मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपीला अटक करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. 

ठळक मुद्देदोडी येथील घटना : आरोपीला अटक करण्याची मागणी

नांदूरशिंगोटे : दोन दिवसापूर्वी पोलीस जावायाने पत्नीसह सासू - सासऱ्यावर चाकूने हल्ला केल्याने तिघेही गंभीर जखमी झाले होते. दरम्यान सासरे निवृत्ती दामोदर सांगळे (52) रा. दोडी ता. सिन्नर यांचे उपचारादरम्यान रविवारी सकाळी निधन झाले. मुलीला वाचवण्यासाठी अंगावर चाकूचे वार झेलत जखमी झालेल्या पित्याने मृत्यूशी झुंज दिली पंरतु तीस तास झुंज देऊनही अखेर पित्याला मृत्यूने कवटाळले असून पत्नी व मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपीला अटक करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. 

  शुक्रवारी(दि. 8) रात्री अकरा वाजता नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले सुरज देविदास उगलमुगले हा दोडी येथे सासरे निवृत्ती दामोदर सांगळे यांच्या घरी पत्नी पुजा हिला भेटण्यासाठी आला होता. पत्नी पुजा हिला घराबाहेर बोलावून मागील  भांडणाची कुरापत काढून चाकूने सपासप वार केले. मुलीच्या किंचाळणे ऐकून वडील निवृत्ती मुलीला सोडविण्यासाठी पुढे आले पण कोणताही मागचा पुढचा विचार न करता सुरजने वार करने सुरूच ठेवले यामध्ये पोटात चाकू घुसल्याने निवृत्ती जागेवर  कोसळले होते. तसेच यामध्ये पुजाची आई शिला सांगळे यांच्यावरही वार झाल्याने गंभीर जखमी झाले होते. आरडाओरडा ऐकल्या नंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु रक्तस्राव जास्त झाल्याने पुढील उपचारासाठी नाशिकच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान निवृत्ती सांगळे यांचे रविवारी सकाळी सहा वाजेदरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समजताच नातेवाईकांनी संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. जोपर्यंत संशयित आरोपी सूरज यास अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी कांगणे यांनी नातेवाईक व ग्रामस्थांची समजून काढली त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आली. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी दोडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, मुलगी नातु असा परिवार आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी