शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 01:54 IST

लेखानगर भागातील झोपडपट्टीत सख्ख्या बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकाराने बाप व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या घृणास्पद प्रकारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहून तिने एका मुलाला जन्म दिल्याने हा प्रकार उघड झाला असून, याप्रकरणी अंबड पोलिसांनी पीडितेच्या बापासह तीन जणांना अटक केली आहे.

ठळक मुद्देमुलाला जन्म दिल्याने प्रकार उघड लेखानगर झोपड पट्टीत नात्याला काळीमा फासणारी घटना

सिडको : लेखानगर भागातील झोपडपट्टीत सख्ख्या बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकाराने बाप व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या घृणास्पद प्रकारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहून तिने एका मुलाला जन्म दिल्याने हा प्रकार उघड झाला असून, याप्रकरणी अंबड पोलिसांनी पीडितेच्या बापासह तीन जणांना अटक केली आहे.

लेखानगर झोपडपट्टीतील पीडित चौदा वर्षीय मुलीने बापानेच आपल्यावर अत्याचार केल्याची फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी लेखानगर झोपडपट्टीत आई, वडील, दोन बहिणी व तीन भावांसमवेत राहात असताना सुमारे ८ ते ९ महिन्यांपूर्वी आई कामाला गेल्यानंतर ती घरात एकटी होती. याचवेळी वडिलांनी दुपारी दाऊ पिऊन येत घरात कोणी नसताना तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर दोन वेळा अशाप्रकारे पीडितेच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार केले; परंतु, वडील मारतील या भीतीने तिने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. याच सुमारास परिसरातील अरबाज शेख याने घडलेल्या प्रकाराविषयी त्याच्याकडे रेकॉर्डिंग असल्याचे सांगत पीडितेला ब्लॅकमेल करीत बळजबरीने अत्याचार केले. रेकॉर्डिंग दाखविण्याच्या धमकीमुळे पीडितेने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र त्याचा अरबाज शेख याने त्याचा गैरफायदा घेत पीडितेवर वारंवार अत्याचार केला. त्याचप्रमाणे झोपडपट्टीतील उत्तम गिरणीवाला यानेही काही महिन्यांपूर्वी पीडितेला त्याच्या गिरणीत बोलावून त्याच्याकडेही घडलेल्या प्रकाराचे रेकॉर्डिंग असल्याचे सांगत ब्लॅकमेल करीत गिरणीच्या मागील बाथरूममध्ये वारंवार अत्याचार केला. अशाप्रकारे पीडितेवर संशयित आरोपी लियाकत मनियार, आरबाज शेख , उत्तम गिरणीवाला यांनी वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर १५ नोव्हेंबरला तिने एका मुलाला जन्म दिला. या प्रकारानंतर घडलेला प्रकार उघड झाला. तिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीनही संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी