महामार्गावर भीषण अपघात : दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 13:37 IST2017-08-14T13:35:32+5:302017-08-14T13:37:41+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदीराजवळ तवेरा कार गॅस टॅँकरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले आहे.

महामार्गावर भीषण अपघात : दोन ठार
नाशिक : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदीराजवळ तवेरा कार गॅस टॅँकरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास मालेगावकडे जाताना हा अपघात घडला. या अपघातात पुष्पा देवकिसन गगराणी व तवेरा चालकाचा जागीच मृत्यू झाला तर देवकिसन गगराणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
टॅँकरला भरधाव कारने दिलेली धडक एवढी भीषण होती की चालकाच्या बाजूने कारचा संपूर्ण भाग कापला गेला. गगराणी यांचा मुलगा व सून अमेरिकेत स्थायिक असून ते त्यांना मुंबई येथे विमानतळावर सोडण्यासाठी गेले होते. तेथून मालेगावकडे परतत असताना नाशिकमध्ये आडगाव शिवारात हा अपघात घडला.