पाण्यासाठी उपोषण
By Admin | Updated: October 19, 2015 22:06 IST2015-10-19T21:43:26+5:302015-10-19T22:06:07+5:30
पाणीबाणी : योजनेत गैरप्रकाराचा आरोप

पाण्यासाठी उपोषण
इंदिरानगर : प्रभाग क्रमांक ५२ मध्ये अवेळी आणि विस्कळीत होणारा पाणीपुरवठा आणि प्रभागातील पाणीपुरवठा योजनेत झालेला भ्रष्टाचार याप्रकरणाची चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाथर्डी फाटा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
प्रभागातील वासननगर, मुरलीधरनगर, माउलीनगर, बाळकृष्णनगर, नरहरीनगर, आनंदनगर, पोलीस वसाहत, ज्ञानेश्वरनगर आदि परिसरात पहाटे दोन वाजेच्या सुमारास पाणीपुरवठा होतो. यामुळे महिंलांना रात्रीचा दिवस करावा लागतो. पाणी भरण्यासाठी त्यांना जागेच रहावे लागते. त्यातही पाणी कमी दाबाने आणि कमी वेळ येत असल्यामुळे अनेकांना पाणी मिळतच नाही. याच मुद्द्यावर यापूर्वीदेखील नागरिकांनी आंदोलन केलेले आहे. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. या मुद्द्यावर माहितीचा अधिकार कायदा जनजागृती अभियानच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलाखाली सदर उपोषण सुरू असून, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)