सिन्नर येथे ठेवी परत मिळण्यासाठी उपोषण
By Admin | Updated: August 21, 2016 00:41 IST2016-08-21T00:27:53+5:302016-08-21T00:41:57+5:30
सिन्नर येथे ठेवी परत मिळण्यासाठी उपोषण

सिन्नर येथे ठेवी परत मिळण्यासाठी उपोषण
सिन्नर : येथील सिन्नर व्यापारी बॅँक, सिन्नर नागरी पतसंस्था, भैरवनाथ नागरी पतसंस्था, रायसोनी पतसंस्था या अडचणीत आलेल्या बॅँकांमध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी निबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
शनिवारी सकाळपासून शिंदे यांनी उपोषणास प्रारंभ केल्यानंतर विविध संघटना व ठेवीदारांनी शिंदे यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. शासनाने बॅँकांच्या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्याची मागणी शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब हांडे, भाऊसाहेब शिंदे, माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, माजी नगरसेवक किरण लोणारे, मुद्रांक विक्रते संघटनेचे बाळासाहेब देशपांडे, गोपाळ गायकर, एकनाथ दिघे आदिंसह ठेवीदार व कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शिंदे यांना पाठिंबा दिला. (वार्ताहर)