पेठ तहसील कार्यालयासमोर उपोषण

By Admin | Updated: November 17, 2015 23:05 IST2015-11-17T23:04:37+5:302015-11-17T23:05:32+5:30

अडवणूक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Fasting before the Peth tahsil office | पेठ तहसील कार्यालयासमोर उपोषण

पेठ तहसील कार्यालयासमोर उपोषण

पेठ : येथील तहसील कार्यालयाकडून आकसबुध्दीने अडवणूक व पिळवणूक केली जात असल्याचा आरोप करीत येथील राहुल मगन पगारे यांनी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे़
तहसीलदार व मंडल अधिकारी यांच्याकडून पेठमध्ये स्वयंरोजगारासाठी ठेवलल्या टपऱ्यांचे अतिक्रमण काढून रोजीरोटी हिरावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही पगारे यांनी केला आहे़
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तहसीलदार व मंडल अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून उपोषण करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे़
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस निरीक्षक आदिंना पाठवण्यात आल्या आहेत़
दरम्यान, निवासी नायब तहसीलदार झिरवाळ यांनी पगारे यांनी उपोषणाबाबत कोणत्याही प्रकारची नोटीस न दिल्याने यासंदर्भात माहिती देता येणार नाही, असे सांगितले़ मंगळवारी दिवसभर उपोषणस्थळी कोणीही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही़ (वार्ताहर)

Web Title: Fasting before the Peth tahsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.