दारू दुकान हलविण्यासाठी उपोषण
By Admin | Updated: October 6, 2015 23:30 IST2015-10-06T23:28:19+5:302015-10-06T23:30:35+5:30
दारू दुकान हलविण्यासाठी उपोषण

दारू दुकान हलविण्यासाठी उपोषण
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील हतगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले बाळकृष्ण वाइन शॉप हे दारू दुकान अन्यत्र हलविण्यात यावे, या मागणीसाठी बहुजन रयत परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात आले. हतगड हा ऐतिहासिक किल्ला असून, तो पाहण्यासाठी पर्यटक येतात व जाताना दारू दुकानातून दारू घेऊन किल्ल्यावरच बाटल्या फेकून विटंबना करतात. त्यामुळे किल्ल्याकडे जाणार्या रस्त्यावर असलेले दारू दुकान बंद करावे किंवा अन्यत्र स्थलांतर करावे आदिंची दखल न घेतल्याने आंदोलन करावे लागत आहे. या आंदोलनात भारत जाधव, अनिल बाविस्कर आदि सहभागी झाले आहेत.