येवला पंचायत समितीसमोर उपोषण

By Admin | Updated: September 9, 2016 00:51 IST2016-09-09T00:51:03+5:302016-09-09T00:51:32+5:30

जळगाव नेऊर : येथील अतिक्र मणप्रश्नी ग्रामस्थांची नाराजी

Fasting in front of Yeola Panchayat Samiti | येवला पंचायत समितीसमोर उपोषण

येवला पंचायत समितीसमोर उपोषण

 येवला : जळगाव नेऊर येथील अतिक्रमणाच्या विरोधात सचिन शिंदे यांनी बुधवार दि.७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरु वात केली आहे.
गेल्या वर्षापासून जळगाव नेउर येथील ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई गोरख कचरू वाघ यांनी अतिक्र मण करून तेथे वास्तव्य करत आहे. या प्रकरणी वारंवार विचारणा करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. उलट ग्रामपंचायत कार्यालाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास टाळटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य व अधिकारी यांचेवर कारवाई करावी अशी मागणी सचिन शिंदे यांनी केली आहे. मागणी पूर्ण होईपर्यत उपोषण सुरु ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Fasting in front of Yeola Panchayat Samiti