झोडगे येथे महावितरण कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 21:43 IST2019-11-28T21:42:26+5:302019-11-28T21:43:41+5:30
मालेगाव : तालुक्यातील झोडगे येथील महावितरणच्या कार्यालयासमोर घाणेगावच्या आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले. मौजे घाणेगाव येथील मोड्याबावस्ती येथे गेल्या २५-३० वर्षांपासून कोणत्याही प्रकारची विजेची सुविधा उपलब्ध नाही तसेच गावाजवळ साधारणत: ३०० ते ४०० मीटर अंतरावर वीज सुविधा उपलब्ध आहे; परंतु गावात अजूनही वीज देण्यात आलेली नाही. गावात सिंगल फेस लाइटची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच याबाबत येथील नागरिकांनी वेळोवेळी प्रांताधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत.

झोडगे येथे वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले विष्णू पांडुरंग सोनवणे, गोकुळ भदाणे, बाबुलाल गायकवाड, किशोर सोनवणे, जगदीश पवार, अनिल सोनवणे, चंदू मोरे, समाधान गायकवाड, धाकू संसारे आदी.
मालेगाव : तालुक्यातील झोडगे येथील महावितरणच्या कार्यालयासमोर घाणेगावच्या आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले.
मौजे घाणेगाव येथील मोड्याबावस्ती येथे गेल्या २५-३० वर्षांपासून कोणत्याही प्रकारची विजेची सुविधा उपलब्ध नाही तसेच गावाजवळ साधारणत: ३०० ते ४०० मीटर अंतरावर वीज सुविधा उपलब्ध आहे; परंतु गावात अजूनही वीज देण्यात आलेली नाही. गावात सिंगल फेस लाइटची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच याबाबत येथील नागरिकांनी वेळोवेळी प्रांताधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत. परंतु वीजपुरवठा न करण्यात आल्याने झोडगे विद्युत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. उपोषणात विष्णू पांडुरंग सोनवणे, गोकुळ कैलास भदाणे, बाबुलाल गायकवाड, किशोर सोनवणे, जगदीश पवार, अनिल सोनवणे, चंदू मोरे, समाधान गायकवाड, धाकू
संसारे, शेखर पगार आदींसह परिसरातील आदिवासी बांधवांचा सहभाग आहे. मालेगाव तालुक्यातील घाणेगाव येथे मोड्याबावस्ती असून येथे कोणत्याही नागरी सुविधा अजून पोहोचलेल्या नाहीत. वीज वितरण कंपनीतर्फे विद्युत जोडण्या झालेल्या नसल्याने आदिवासी बांधवांना आजही अंधारात रहावे लागत आहे. वारंवार संबंधितांकडे वीजपुरवठा करण्यासंदर्भात मागणी करुनही दुर्लक्ष होत असल्याने उपोषण करावे लागत आहे.