रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपोषण
By Admin | Updated: October 6, 2015 23:32 IST2015-10-06T23:31:24+5:302015-10-06T23:32:27+5:30
रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपोषण

रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपोषण
नाशिक : नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून ग्रामस्थांचा रस्ता बंद करणार्यांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. बोलठाण येथील शासकीय जागेत घाडगे, रिंठे, फाटके यांनी गेल्या तीन वर्षांपासून अतिक्रमण केल्यामुळे ग्रामस्थांचा वर्दळीचा रस्ता बंद झाला आहे. या संदर्भात लोकशाही दिनात तक्रार करून ग्रामपंचायतीला अतिक्रमण काढण्या साठी आदेशही देण्यात आले; परंतु तीन वर्षांपासून यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे अतिक्रमण करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, कामचुकार अधिकार्यांना निलंबित करण्यात यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.