पोलीसपाटलांचे मागण्यांसाठी उपोषण

By Admin | Updated: July 6, 2017 00:14 IST2017-07-06T00:13:45+5:302017-07-06T00:14:00+5:30

पोलीसपाटलांचे मागण्यांसाठी उपोषण

Fasting for the demands of police stations | पोलीसपाटलांचे मागण्यांसाठी उपोषण

पोलीसपाटलांचे मागण्यांसाठी उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्क
लोहोणेर : राज्यातील पोलीसपाटलांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या दिवशी राज्यातील तसेच जिल्ह्यातील पोलीसपाटील संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य पोलीसपाटील असोसिएशन संपर्कप्रमुख केवळ भामरे व नाशिक जिल्हाध्यक्ष योगेश गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकऱ्यांसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांनी दि.१२ जुलै रोजी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर होणाऱ्या लाक्षणिक उपोषणात सामील होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील बंधू भिगनींनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सकाळी ९.३०वा.मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनचे संपर्क प्रमुख केवळ भामरे यांनी केले आहे.

Web Title: Fasting for the demands of police stations