पतसंस्थेच्या शाखाधिकाऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 00:36 IST2020-11-03T00:36:01+5:302020-11-03T00:36:39+5:30
पेठ : नोटाबंदीनंतर डबघाईस आलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेत अडकलेल्या पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी छत्रपती नाशिक जिल्हा महिला पतसंस्थेच्या पेठ शाखेतील शाखाधिकाऱ्यांना अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला आहे.

पेठ येथील जिल्हा बँकेच्या शाखेसमोर उपोषणास बसलेले छत्रपती नाशिक जिल्हा महिला पतसंस्थेचे शाखाधिकारी सुरेश गावीत.
पेठ : नोटाबंदीनंतर डबघाईस आलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेत अडकलेल्या पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी छत्रपती नाशिक जिल्हा महिला पतसंस्थेच्या पेठ शाखेतील शाखाधिकाऱ्यांना अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला आहे.
छत्रपती नाशिक जिल्हा महिला पतसंस्था मनमाडच्या पेठ शाखेचे नाशिक जिल्हा बँकेच्या पेठ शाखेत तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांच्या ठेवी अडकल्याने दैनंदिन व्यवहार जवळपास दोन वर्षांपासून ठप्प झाले आहेत. आजमितीस पतसंस्थेचे ७० लाख रुपये अल्पबचत प्रतिनिधींच्या माध्यमातून देणे असल्याने पतसंस्था डबघाइस आलेली आहे. ठेवीदार दररोज पतसंस्थेत येऊन त्यांचे देणेबाबत विचारणा करीत असल्याने विलंबामुळे त्यांचाही संयम सुटत चाललेला असल्याने शाखाधिकारी सुरेश गावीत यांनी नाशिक जिल्हा बँकेच्या पेठ शाखेपुढे आमरण उपोषण सुरू केले आहे.
जवळपास दोन वर्षांपासून एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम अडकल्याने पतसंस्था दिवाळखोरीत निघण्याची भीती व्यक्त केली जात असून, नाशिक जिल्हा बँक प्रशासन काय निर्णय घेते, यावर पतसंस्थेच्या सभासदांचे लक्ष लागून आहे.