शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या विरोधात तहसीलसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:11 IST

नांदगाव : वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सहकारी अधिकाराचा दुरुपयोग करत मनमानी कारभार करित असल्याच्या निषेधार्थ १५ आॅगस्ट रोजी जुन्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुरेश शेळके, संपत पवार व संतोष बिन्नर यांनी दिले आहे.

ठळक मुद्देबनावट सह्यांच्या आधारे निधीचा गैरवापर केल्याचाही आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सहकारी अधिकाराचा दुरुपयोग करत मनमानी कारभार करित असल्याच्या निषेधार्थ १५ आॅगस्ट रोजी जुन्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुरेश शेळके, संपत पवार व संतोष बिन्नर यांनी दिले आहे.निवेदनाच्या प्रती नाशिकचे उपवनसंरक्षक, चांदवडचे सहायक उपवनसंरक्षक, नांदगावचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. मौजे हिरेनगर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती, तसेच ग्राम वनसमितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता टू टेन जेसीबी व ट्रॅक्टर या यंत्राद्वारे जंगलातील काळी कसदार माती उपसा करणे, वृक्षतोड, परगावाहून आलेल्या व्यक्तींचे कुठलेही कागदपत्र न तपासता स्वत:च्या अधिकारात पक्के घरे बांधण्याची तोंडी परवानगी देणे, लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यास असमर्थ तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समिती व इतर समित्यांना आलेला निधी समित्यांच्या खात्यावर वर्ग न करता स्वत:च्या खात्यावर जमा करून बनावट सह्यांच्या आधारे निधीचा गैरवापर केल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.आमदार सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेतही वरिल अधिकाऱ्यांच्या बाबतीत आरोप करण्यात आले. वनपरिमंडळ अधिकारी सोनवणे यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा आदेश देण्यात आला असून, तशी नोंद आमसभेच्या इतिवृत्तात करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Tehsil office mehkarतहसिल कार्यालय मेहकरforestजंगल