फॅशन शो’चा वीजपुरवठा खंडित; वॉचमनला मारहाण

By Admin | Updated: February 11, 2017 00:35 IST2017-02-11T00:35:07+5:302017-02-11T00:35:25+5:30

फॅशन शो’चा वीजपुरवठा खंडित; वॉचमनला मारहाण

Fashion show's power supply breaks; Watchman beat up | फॅशन शो’चा वीजपुरवठा खंडित; वॉचमनला मारहाण

फॅशन शो’चा वीजपुरवठा खंडित; वॉचमनला मारहाण

‘नाशिक : फॅशन शो दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून डीजेचालकाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूररोडवरील एका लॉन्समध्ये घडली़ गंगापूर पोलीस ठाण्यात शिवदास चव्हाण (मूळ रा. चिंचोरे, ता. कळवण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वृंदावन लॉन्स येथे बुधवारी रात्री फॅशन शोचा कार्यक्रम सुरू होता. रात्री अचानक इलेक्ट्रिक स्पार्क होऊन लाइट बंद झाले. यावेळी डीजेचालक संशयित धीरज खैरनार (२१, रा. हिरावाडी) याने सुरक्षारक्षक चव्हाण यास लोखंडी खुर्ची फेकून मारली़ यावेळी रवींद्र कुंवर हे वाद सोडविण्यासाठी आले असता डीजेचालक खैरनार व सुरज खैरनार, सागर सूर्यवंशी यांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Fashion show's power supply breaks; Watchman beat up