पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त
By Admin | Updated: July 12, 2014 00:27 IST2014-07-11T22:26:32+5:302014-07-12T00:27:37+5:30
पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त

पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त
पाळे खुर्द परिसरात पाऊस न पडल्यामुळे सद्यस्थितीत शेतामध्ये उभी असलेली पिके पूर्णत: धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
४पाळे खुर्द परिसरात शेतकऱ्यांनी बागायती शेतीमध्ये ऊस, मिरची, टमाटा, कोबी, कोथिंबीर, डाळींब व द्राक्ष पिकाची लागवड केली आहे. आतापर्यंत विहिरीच्या पाण्यावर सदर पिकांना पाणी मिळत होते. परंतु पाऊस नसल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी पूर्णत: खालावली असून, बहारदार पिके आता मृत होताना पहावयास मिळत आहेत.
४यंदा पाळे खुर्द गावाने एवढा मोठा दुष्काळ प्रथमच अनुभवला असून, बुजुर्ग लोकांकडून सांगण्यात येते. १९७२ला जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा पाळे खुर्द परिसरात पाण्याची कुठलीही टंचाई जाणवली नाही. त्यावेळी गिरणा नदी पात्र तुडुंब भरले होते; परंतु बुजुर्गांनी पाळे खुर्द परिसरात पाण्याचा कधीच दुष्काळ अनुभवला नाही.