शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार : गोसावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 10:53 PM2020-09-23T22:53:12+5:302020-09-24T01:38:28+5:30

लोहोणेर : मागील आठ वर्षांपासून शिवनिश्चल सेवा भावी ट्रस्टच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूर यांच्या मुलांसाठी सातत्याने काम करणारे शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी शेतकरी, शेतमजुरांच्या ५०पेक्षा जास्त मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करून किसान युवाक्रांती संघटनेची घोषणा केली.

Farmers will raise questions: Gosavi | शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार : गोसावी

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार : गोसावी

googlenewsNext
ठळक मुद्दे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम झालं पाहिजे

लोहोणेर : मागील आठ वर्षांपासून शिवनिश्चल सेवा भावी ट्रस्टच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूर यांच्या मुलांसाठी सातत्याने काम करणारे शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी शेतकरी, शेतमजुरांच्या ५०पेक्षा जास्त मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करून किसान युवाक्रांती संघटनेची घोषणा केली.
शिवनिश्चल ट्रस्टच्या माध्यमातून ज्या मुलांसाठी काम चालू आहे ते सर्व मूल आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजुरांची आहेत, हे कुठेतरी थांबवायचे असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम झालं पाहिजे म्हणून या संघटनेची स्थापना करण्यात आल्याची माहिती गोसावी यांनी दिली. गोसावी म्हणाले की, या संघटनेत शेतकºयांची मुलांबरोबर ज्या शेतकºयांची मूल बी.एस्सी. अग्री झालेली आहेत, आयटी क्षेत्रात आहेत, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील तरुणांना जोडून हे संघटन मजबूत करण्यात येणार आहे. शेतकरी मेल्यावर सरकारकडून मदत होते. मात्र शेतकरी जगविण्यासाठी मदत केली जात नाही. स्वामिनाथन आयोग, शेतकरी पेन्शन योजना यासारख्या प्रश्नावर संघटना काम करणार आहे. राज्यभरातील शेकडो तरुण याआधीच जोडले गेले असून, येत्या काळात संपूर्ण देशभर शेतकºयांचे संघटन उभे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी गोसावी यांनी दिली.

Web Title: Farmers will raise questions: Gosavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.