ताराहाबाद येथे शेतकऱ्याची आत्महत्त्या
By Admin | Updated: July 22, 2016 00:48 IST2016-07-22T00:45:51+5:302016-07-22T00:48:36+5:30
ताराहाबाद येथे शेतकऱ्याची आत्महत्त्या

ताराहाबाद येथे शेतकऱ्याची आत्महत्त्या
ताहाराबाद : येथील महेश नामदेव नंदन (२७) या तरुण शेतकऱ्याने कर्जाला व शेतातील नुकसानीस कंटाळून गळफास घेऊन आत्महत्त्या केली.
महेश नंदन याने टॅक्टरच्या हुकला दोर बांधून गळफास घेऊन आपला जीवनाचा प्रवास संपविला. २०१० मध्ये शेतीसाठी बॅँकेकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र शेतीवर आलेल्या विविध संकटांमुळे तसेच डाळींब पिकावर आलेल्या तेल्या रोगामुळे बँकेच्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. यामुळे नैराश्यातून महेशने आत्महत्त्या केली. सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. जायखेडा पोलिसात याबाबत नोंद झाली आहे. त्याच्या मागे पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, सहा महिन्याची मुलगी, आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.(वार्ताहर)